CTET PRE ADMIT CARD UPDATE केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा केंद्र जाहीर

Risingteachers
0

 





केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या अर्जदारांसाठी CTET ने एक महत्वाची सूचना प्रसिद्ध केली असून , ज्यांनी 27/04/2023 ते 26/05/2023 पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा शुल्क भरले होते, अशा सर्व उमेदवारांची  परीक्षा 20/08/2023 रोजी OMR (ऑफलाइन) मोड आधारित घेतली जाणार आहे . 

अर्जदारांचे प्रवेशपत्र, त्यांना दिलेल्या परीक्षा शहराच्या तपशिलांसह, CTET (https://ctet.nic.in) वेबसाइटवर अपलोड केले आहेत.

CTET परीक्षेसाठी अर्ज करताना  उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षेनुसार परीक्षा शहराची निवड केली होती, मात्र आता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत असून परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार परीक्षा शहरे बदलली आहेत, अशीही माहिती CTET ने अर्जदारांना  दिली आहे. त्यामुळे, अर्जदारांनी त्यांच्या ऑनलाइन फॉर्ममध्ये दिलेल्या त्यांच्या सध्याच्या पत्त्याच्या जिल्ह्याच्या आधारावर, त्यांना त्यांच्या सध्याच्या पत्त्याच्या जिल्ह्याच्या जवळचे परीक्षा शहर देण्यात आले आहे

परीक्षेचे शहर बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.

परीक्षा केंद्रांचे तपशीलवार वर्णन असलेले CTET प्रवेशपत्र finle ADMIT CARD 18/08/2023 रोजी CBSE च्या वेबसाइटवर (https://ctet.nic.in) अपलोड केले जाणार आहे . 



EXAM CITY पहाण्यासाठी लिंक इथे क्लिक करा


CTET PUBLIC NOTICE  पहा 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)