आज शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत पवित्र पोर्टलवर वर सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत .
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ ही ऑनलाईन दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.
२. या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या PAVITRA PORTAL पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
३. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
४. सन २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका (Stamp) क्र ४४३४ /२०२३, १८२४/२०२३ व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचीका क्र १९५३/२०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेश पत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते, असे असतानाही काही उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर ते सहभागी करून घेता येणार नाही. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
६. उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक १५/०९/२०२३ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
७. ज्या उमेदवारांच्या TET /CTET च्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील आपण निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडून सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, ओळखीच्या पुरावा व सबंधित कागदपत्रे यासह संपर्क साधावा. सदरची सुविधा लवकरच देण्याबाबत स्वतंत्रपणे पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
८. सन २०१९ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत दिनांक ९/८/२०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील अपात्र, गैरहजर रुजू न झालेले उमेदवार यांचे जागी पुढील उमेदवारांसाठी यादी प्रसिद्ध करावयाची आहे, त्यासाठी जिल्ह्याकडील माहिती प्राप्त झाली आहे, त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यासाठी स्वतंत्र सूचना देण्यात येतील.