CTET EWS RESERVATION शासन पत्र दिनांक ९ जून २०२३ मध्ये राज्यातील EWS पात्र विद्यार्थी केंद्राच्या CTET परीक्षेमध्ये इतर आरक्षित प्रवर्गातील अरक्षणानुसार पात्रता गुणांमध्ये ५ % सवलतीस पात्र आहेत असे स्पष्ट केले आहे.

Risingteachers
0

 



शासन पत्र दिनांक ९ जून २०२३ मध्ये राज्यातील EWS पात्र विद्यार्थी केंद्राच्या  CTET परीक्षेमध्ये इतर आरक्षित प्रवर्गातील अरक्षणानुसार पात्रता गुणांमध्ये ५ % सवलतीस पात्र आहेत असे स्पष्ट केले आहे. त्या सदर्भातील पत्र खालीलप्रमाणे आहे. 

इतर सर्व GR आणि पत्राच्या PDF लिंक  खाली  दिल्या आहेत. 

शासन निर्णय, दिनांक ०७.०२.२०१९ अन्वये राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. यामधील परिच्छेद क्र. ३ अन्वये, इयत्ता १ ली ते ८ वी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरीता अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती-ब/भटक्या जमाती-क/ भटक्या जमाती ड / इतर मागास प्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग/ सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक/ दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये ५ टक्के सूट देण्यात आली आहे. तथापि, शासन निर्णय दिनांक ७.२.२०१९ मधील परिच्छेद ३ मध्ये केंद्रशासन व राज्यशासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने CTET उत्तीर्ण आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांतील (EWS) उमेदवारांना सदर परीक्षेतील गुणांमध्ये ५ % सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे यासंदर्भात विविध संघटनांची व लोकप्रतिनिधीची निवेदने प्राप्त होत आहेत.

याअनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन व राज्य शासन आयोजित अथवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमधील सूट याबाबतची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मध्ये नमूद आहे.

तसेच संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ मध्ये देखील याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या करण्यात आली आहे.

०३. यास्तव स्पष्ट करण्यात येते की, सदर शासन निर्णयातील परिच्छेद ३ येथील पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेकरीता लागू आहे.


CTET EWS आरक्षण संदर्भात माहिती स्पष्ट करणारा व्हिडिओ


CTET EWS 5 % RESERVATION GR PDF LINK



EWS MAIN GR PDF LINK
MAHATET EWS RESERVATION लागू केल्याचा GR PDF LINK
शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता GR ७/०५/२०१९ PDF लिंक

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)