१) शिक्षक अभिक्योग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टल मार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थाकरीता मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पदभरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.
२) मुलाखतीसह पदभरतीमध्ये SEBC प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांकडे जाहिरातीमध्ये खुला (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा उर्वरित १९६ व्यवस्थापनांसाठी SEBC प्रवर्गासाठीच्या जागा योग्य त्या प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवाराकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. आता या १९६ व्यवस्थापनांसाठी मुलाखतीसह पदभरतीकरीता अध्यापन व कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.
३) मुलाखतीसह पद भरतीमध्ये उर्वरित १९६ व्यवस्थापनांतील इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
४) या व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यापूर्वीच्या तरतुदीनुसार एका जागेकरीता १:१० या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत ) उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
५) मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही व्यवस्थापनांकडून दिनांक १८/०७/२०२३ ते दिनांक ११/०८/२०२३ या कालावधीत करण्यात येईल.
६) उमेदवाराने लॉगीन केल्यानंतर त्यातील Applicant Recommended Status वर क्लिक केल्यानंतर - View Recommended Institute List यावर क्लिक केल्यानंतर मुलाखतीसाठी निवड झालेल्या जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रमाची यादी दिसेल. View Preferencewise status यावर क्लिक केल्यानंतर एकूण प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेले प्राधान्यक्रम दिसतील. त्यानुसार आपण मुलाखतीसाठी निवड झालेल्या संस्थेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा अथवा संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांचेकडे संस्थेबाबत अधिक तपशील मिळवावा
७) उमेदवाराने लॉगीन केल्यानंतर त्यातील Print Preferences वर क्लिक केल्यानंतर – PDF of Lock Preference व PDF of Generated Preference दिसतील. यावर क्लिक केल्यानंतर संबंधित प्राधान्यक्रम दिसतील.
८) प्राधान्यक्रम Generate करताना ६९१९ उमेदवाराना प्राधान्यक्रम कमी/अधिक प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांच्या पात्र व lock केलेल्या प्राधान्यक्रमावर कार्यवाही करणे आवश्यक होते. यास्तव सर्वच उमेदवारांना लॉगीन केल्यानंतर त्यातील Considered Locked PREFERENCES यावर क्लिक केल्यानंतर आपले निवड प्रक्रियेत विचारात घेतलेले संबंधित प्राधान्यक्रम दिसतील.
९) मुलाखतीस शिफारस होण्यासाठी जाहिरातीतील त्याच्या प्रवर्गाचे/खुल्या प्रवर्गाचे (समांतर आरक्षण ) गुण व संबंधित गटातील विषयाचे गुण या दोन्हीमध्ये cutoff गुणापेक्षा अधिक आवश्यक आहेत.
१०) उमेदवाराची गुणवतेनुसार ज्या प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झाली नाही, तेथे संबंधित प्राधान्यक्रमाचा विषय व स्वतःचे आरक्षण/खुल्या प्रवर्गाचे या दोन्हीचे गुण जास्त आहेत त्यामुळे शिफारस झालेली नाही.
११) उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील, उमेदवारांची अंतीम निवड या ३० गुणाच्या आधारे व्यवस्थापनाकडून मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट, विषय व आरक्षण विचारात घेऊन निवड केली जाईल.
१२) उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र (self certified copy) अंतिम करताना आरक्षित प्रवर्गातील (SC व ST वगळून) Non-creamy layer अथवा EWS जे लागू असेल त्या प्रमाणपत्राबाबत No असे नमूद केले असल्यास अशा उमेदवारांना खुला (General) प्रवर्ग विचारात घेऊन गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे.
१३) उमेदवारांनी मुलाखतीसह पदभरतीकरीता अधिकच्या माहितीसाठी पोर्टलवर अपलोड केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करावे.
१४) निवड प्रक्रियेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधावा.
१५) शासन पत्र दिनांक १९/०४/२०२३ व १२/०६/२०२३ अन्वये सन २०१७ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवतेनुसार दिनांक ९/८/२०१९ च्या राउंड मध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागासाठी माजी सैनिक यांची स्वतंत्र विशेष निवड प्रक्रिया केली जाईल व त्यानंतर माजी सैनिक उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागापैकी १० टक्के जागा रिक्त ठेऊन उर्वरित जागा त्या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण (pure) मध्ये रुपांतरीत करून या जागासह अपात्र / गैरहजर यांच्या रिक्त जागेसाठी राउंड घेण्यात येईल. नव्याने सन २०२३ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवतेनुसार कार्यवाही करताना याची कार्यवाही स्वतंत्र करण्यात येईल.
१६) १९६ व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम लॉक केलेल्या उमेदवारांनाकरीता लॉगीन उपलब्ध होईल.
१७) उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या edupavitra@gmail.com या email वर संपर्क साधता येईल.
196 संस्था मुलाखत शिफारस पात्र यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध | pavitra portal with interview recommended list
July 15, 2023
0
उमेदवारांसाठी सूचना दिनांक १५/०७/२०२३
196 संस्था मुलाखत पात्र उमेदवार यादी
Tags